Ads By Google

Post office Schemes

 या योजनेचे ठळक वैशिष्ट्ये खालील प्रमाणे आहेत:


A.कोण उघडू शकते हे खाते:-


एकच प्रौढ व्यक्ती


संयुक्त खाते (3 प्रौढ व्यक्तीपर्यंत) (संयुक्त ए किंवा बी )


अल्पवयीन किंवा अस्वस्थ मनाच्या व्यक्तीच्या वतीने पालक उघडू शकते


10 वर्षांवरील अल्पवयीन त्याच्या स्वतः च्या नावावर हे खाते उघडू शकतात.


B. ठेव/जमा काय असेल :


खाते किमान 1000 रुपये ते 1000 रुपयांपेक्षा जास्त


किमान एका खात्यात 4.50 लाख आणि संयुक्त खात्यात नऊ लाख रुपये जमा करता येतात


संयुक्त खात्यात सर्व संयुक्त धारकांना गुंतवणुकीत समान वाटा असेल


एखाद्या व्यक्तीने उघडलेल्या सर्व MIS खात्यामधील ठेवी/शेअर्स 4.50 लाख रुपयापेक्षा जास्त नसतील


अल्पवयीन व्यक्तीच्या वतीने पालक म्हणून उघडलेल्या खात्याचा मर्यादा वेगळा असेल


C. व्याज MIS मध्ये काय असेल :


खाते उघडल्याच्या तारखेपासून एक महिना पूर्ण झाल्यावर आणि मुदतपूर्ती पर्यंत व्याज देय असेल.


दरमहा देय व्याज खातेदाराने दावा केला नसेल तर अशा व्याजावर कोणतेही अतिरिक्त व्याज मिळणार नाही.


ठेवीदाराने कोणतेही जास्तीची ठेवल्यास जास्तीची ठेव परत केली जाईल आणि खाते उघडल्याच्या तारकेपासून परताव्याच्या तारखेपर्यंत फक्त PO बचत खाते व्याज लागू होईल.


त्याच पोस्ट ऑफिस किंवा ECS मधील बचत खात्यात ऑटो क्रेडिट द्वारे व्याज काढले जाऊ शकते. CBS पोस्ट ऑफिस मध्ये MIS खात्याच्या बाबतीत मासिक व्याज कोणत्याही CBS पोस्ट ऑफिस मध्ये असलेल्या बचत खात्यात जमा केले जाऊ शकते.


ठेवीदाराच्या हातात व्याज हे करपात्र असणार आहे.


D. प्री मॅच्युअर खाते बंद करणे कसे असेल:


ठेव ठेवण्याच्या तारखेपासून एक वर्षाची मुदत संपण्यापूर्वी कोणतीही ठेव काढली जाऊ शकणार नाही.


खाते उघडण्याच्या तारखेपासून 1 वर्षानंतर आणि 3 वर्षाच्या पूर्वी खाते बंद केल्यास मुद्दलामधून 2% इतकी वजावट केली जाऊ शकते आणि उर्वरित रक्कम दिली जाईल.


खाते 3 वर्षानंतर आणि खाते उघडल्याच्या तारखेपासून 5 वर्षांपूर्वी बंद केल्यास मुद्दल मधून 1% इतकी वजावट केली जाणार आणि उर्वरित रक्कम दिली जाईल


संबंधित पोस्ट ऑफिस मध्ये पासबुकसह विहित अर्ज सादर करून खाते मुदतीपूर्वी बंद केले जाऊ शकते


E. मॅच्युरिटी काय असेल:


खाते उघडण्याच्या तारखेपासून पाच वर्षाच्या समाप्तीनंतर संबंधित पोस्ट ऑफिस मध्ये पासबुकसह विहित अर्ज सादर करून खाते बंद केले जाऊ शकते.


मुदतपूर्ती पूर्वी खातेधारकाच्या मृत्यू झाल्यास खाते बंद केले जाऊ शकते आणि नामनिर्देशित व्यक्ती कायदेशीर वारसांना रक्कम परत केली जाईल मागील महिन्यापर्यंत व्याज दिले जाईल यामध्ये असे परतावा केले जाईल.


खाते कोणते लागते ?


तुम्हाला पोस्ट ऑफिस मासिक बचत योजनेमध्ये पती-पत्नी प्रत्येक महिन्याला मिळून कमाई करू शकतात यामध्ये तुम्ही एक संयुक्त खाते देखील उघडू शकता आता या योजनेमध्ये तुम्हाला डबल फायदा कसा होईल.


 


दरवर्षी कमाई होईल


या योजनेमध्ये जॉइंट अकाउंट च्या माध्यमातून लाभ तुम्हाला डबल मिळू शकतो आम्ही आज तुम्हाला अशा एका योजनेच्या संदर्भात माहिती देत आहोत पती-पत्नी दोन्ही मिळून या योजनेच्या फायदा घेऊ शकतात वर्षाला 59,400 रुपये या योजने अंतर्गत तुम्हाला दिले जाते.


 


Post Office MIS म्हणजे काय ?


पोस्ट ऑफिस MIS योजनेत उघडलेले खाते सिंगल किंवा जॉईंट खाते या पद्धतींने आपण खोलू शकतो. वैयक्तिक खाते उघडताना तुम्ही या योजनेत कमीत कमी 1000 रुपये आणि जास्तीत जास्त 4.5 लाख रुपये गुंतवू शकता.


संयुक्त खात्यात जास्तीत जास्त 9 लाख रुपये पर्यंत जमा करता येते..


 


हे मिळणार MIS फायदे


MIS दोन किंवा तीन लोकसंयुक्त खाते देखील उघडू शकतात


या खात्याच्या बदल्यात मिळणारे जे उत्पन्न आहे ते प्रत्येक


सभासदाला समान दिले जाते


तुम्ही संयुक्त खाते हे कधीही वैयक्तिक खात्यामध्ये रूपांतर


करू शकता


तुम्ही वैयक्तिक खात्याला सुद्धा संयुक्त खात्यामध्ये रूपांतर करू शकता


या खात्यामध्ये कोणतेही बदल करण्यासाठी सर्व सदस्यांनी एक संयुक्त अर्ज द्यावे लागते.


टीप:- राष्ट्रीय बचत (MIS) खाते नियमानुसार 2019


या योजनेमधून मिळणार असा लाभ


तुम्हाला या योजनेमध्ये जे मिळणारे व्याजदर जे आहे 6.6 % असणार आहे.


या योजनेअंतर्गत वार्षिक तुमची जेवढी रक्कम जमा होईल त्या रकमेनुसार तुम्हाला रिटर्न व्याजेच्या हिशोबानुसार मिळेल.


यामध्ये परत तुम्हाला मिळणारी जी रक्कम आहे ती वर्षानुसार मिळेल.


या योजनेअंतर्गत तुमच्या एकूण ठेवीवरील वार्षिक व्याजच्या आधारावर परतावा ठरला जातो.


तुम्हाला मिळणारी जी रक्कम आहे ती प्रति महिना याप्रमाणे सुद्धा मिळू शकते जर तुम्हाला पाहिजे असेल तर.


जर तुम्हाला या योजनेमधून प्रत्येक महिन्याला रक्कम घ्यायची नसेल ती रक्कम तुम्ही मुद्दलामध्ये जोडून व्याज देखील घेऊ शकता.


पैसे कसे मिळतील परत


या योजनेअंतर्गत पती-पत्नी जॉईंट अकाउंट मध्ये 9 लाख रुपये जमा केले तर त्यांना 9 लाखावर व्याज 6.6 % दराने वर्षाला मिळेल.


व्याजच्या दराने वार्षिक रिटन जे आहे 59,400 मिळणार.


जर तुम्हाला वर्षाला पाहिजे नसेल प्रत्येक महिन्याला पाहिजे असेल तर तुम्ही यामध्ये प्रति महिना 4950 रुपये याप्रमाणे तुमच्या खात्यात घेऊ शकता.

Post a Comment

Previous Post Next Post