Ads By Google

आगाखान एजन्सी फॉर हॅबिटॅट इंडियाच्या वतीने क्षमतावृदधी प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

 करमाड प्रतिनिधी :-   औरंगाबाद तालुक्यातील भांबर्डा येथे शुक्रवार दि.१६ सप्टेंबर रोजी  आगाखान एजन्सी फॉर  हॅबिटॅट इंडियाच्या वतीने एक दिवशीय महिला,युवक आणि शेतकऱ्यां करिता पाणलोट संदर्भ, पडित जमिनीचा विकास करणे, जलसाक्षरता चळवळ राबविणे, पाण्याचा योग्य वापर, पाण्याचे पुनर्भरण व पाणीबचत पीक पद्धती अवलंबन करणे, जमिनीची धूप नियंत्रण करणे, सेंद्रिय शेती, सेंद्रिय खत निर्मिती अशा विविध विषयांवर मार्गदर्शक  माहिती चर्चा सत्र एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आले होते.



 या कार्यशाळेत पाणलोट संदर्भात माहिती देताना  पाणलोट तज्ञ तथा मार्गदर्शक प्रा.अविंद येळम म्हणाले की, आपल्या भागातील डोंगरावरील पाणी छोट्या नाल्या स्वरूपात वाहून जाते त्याचे पाणलोट चर पध्द्तीने व दगडी बाध, मातीबाध,सिमेंट बंधारे, माती बंधारे पध्दत अवलंबून पाणलोट क्षेत्र वाढविता येते असे मत व्यक्त करत चित्रफिती दाखवुन पाणलोट विकास करण्यासाठी काय करणे गरजेचे आहे याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.  पंचायत समिती कृषी विस्तार अधिकारी श्री.गायकवाड यांनी सेंद्रिय शेती व सेंद्रिय खत निर्मिती याबाबत माहिती देत शेणखत, गांडूळ खत, पालापाचोळ्यापासून तयार केलेले खत याची कशी निर्मिती करावी याबाबत सविस्तर माहिती दिली तसेच पंचायत कृषी सहाय्यक श्री.जोशी  यांनी शेतात औषध फवारणी करत असताना शेतकऱ्यांनी विशेष सुरक्षा किट परिधान करून फवारणी करावी आणि किट कशाप्रकारे परिधान करावी या संदर्भात माहिती दिली जेणेकरून शेतकऱ्यांना  फवारणी केल्यानंतर होणाऱ्या विषबाधेवर नियंत्रण मिळवता येईल यासाठी विशेष मार्गदर्शन करण्यात आले.  पर्यावरण जनजागृती संस्था वतीने सुभाष उकर्डे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद शाळेत मोहगुणी वृक्षाची वृक्षारोपण करण्यात येऊन शाळा  परिसरात ऑक्शन युक्त झाडे लागवड करत या ठिकाणी ऑक्सिजन पार्क तयार करण्यात आला आहे.


  या कार्यक्रमासाठी करमाड सरपंच कैलास उकर्डे, भांबर्डा सरपंच इंदूताई पठाडे, मंडळ अधिकारी गोरे, तलाठी निता चव्हाण, वनविभागाचे वनपाल शिंदे, वन कर्मचारी बचाटे, पंचायत समितीचे कृषी विस्ताराधिकारी श्री.गायकवाड, पंचायत समितीचे कृषी सहाय्यक जोशी, तेजराव पठाडे,भीमराव पठाडे, सोमनाथ जाधव, दगडू काळे, भीवसन काळे, संताराम फुकटे, कुडलिक भवर, शहादेव काळे, त्रिंबक पठाडे, पंडित दिवटे राजेंद्र पठाडे, मुरलीधर भवर,  भगवान काळे, नितीन काळे,  यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 




     हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी आगाखान एजन्सी फॉर  हॅबिटॅट इंडियाचे कार्यक्रम व्यवस्थापक राजकुमार तोगरे, समन्वयक दिव्यांशू राज, आकाश घुले, प्रेरणा देशमुख, धोंडीराम पडूळ, संदीप शिंदे यांनी परिश्रम घेतले होते.

Post a Comment

Previous Post Next Post