Ads By Google

महाराष्ट्रातली महाविद्यालयं 15 फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार

 


कोव्हिड 19ची वाढती रुग्णसंख्या पाहता महाराष्ट्रातली कॉलेजेस 15 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याचं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जाहीर केलंय.

यामध्ये अकृषी विद्यापीठे, स्वयं अर्थसहाय्य विद्यापीठे, तंत्रनिकेतन तसेच विद्यापीठांशी संलग्नित महाविद्यालयांचा समावेश आहे.

पण ऑनलाईन माध्यमातून वर्ग आणि शिक्षण सुरू राहणार आहे.

ज्या महाविद्यालयांच्या परीक्षा होऊ घातल्या आहेत त्यांनी त्या ऑनलाईन पद्धतीने घ्याव्यात अशी सूचना राज्य सरकारने दिली आहे. यासोबत जे विद्यार्थी कोरोना बाधित आहेत किंवा वीज उपलब्ध नसल्याने ज्यांना परीक्षेला बसता येणार नाही असे विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाहीत याची काळजी महाविद्यालयांनी घ्यावी, असंही सांगण्यात आलेलं आहे.


दहावी - बारावी वगळता मुंबईत शाळाही बंद

मुंबईत दहावी आणि बारावीचे वर्ग वगळता इतर सर्व शाळा 31 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिका प्रशासनाने जाहीर केलेला आहे.

महापालिका क्षेत्रातील सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व माध्यमांच्या शाळा प्रत्यक्ष अध्यापनासाठी बंद ठेऊन ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरू ठेवण्याची सूचना बीएमसी शिक्षण विभागाने केली आहे.

मार्च 2020 मध्ये राज्यातील शाळा बंद केल्यानंतर थेट 15 डिसेंबर 2021 रोजी पहिलीपासूनच्या शाळा सुरू झाल्या. परंतु आता पुन्हा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची तीव्रता पाहता खबरदारी म्हणून शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


Post a Comment

Previous Post Next Post