Ads By Google

Omicron : मुंबईत बुधवारी 15,166 नवीन कोव्हिड रुग्ण, राज्यात 26,538 रुग्णांची नोंद

 मुंबईमध्ये बुधवारी 5 जानेवारीला 15 हजार 166 नवीन रुग्णांची नोंद झाली.

तर महाराष्ट्रात आज 26 हजार 538 नवीन रुग्ण आढळले आहेत, तर 8 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईतल्या आजच्या 15 हजार 166 नवीन रुग्णांपैकी 1,218 रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे. यापैकी 80 रुग्ण ऑक्सिजन बेडवर आहेत. तर 13 हजार 195 रुग्ण एसिम्प्टमॅटिक म्हणजे कोणतीही लक्षणं न आढळलेले आहेत.

महाराष्ट्रात आज ओमिक्रॉनचा संसर्ग असणारे 144 नवे रुग्ण आढळले आहेत. यापैकी मुंबई 100, नागपूरमध्ये 11, पुणे आणि ठाणे मनपा 7, कोल्हापूर 5, अमरावती, उल्हासनगर आणि भिवंडी निजामपूरमध्ये प्रत्येकी 2 तर पनवेल आणि उस्मानाबादमध्ये प्रत्येकी 1 ओमिक्रॉन रुग्ण आढळला आहे.

आतापर्यंत राज्यात एकूण 797 ओमिक्रॉन संसर्ग झालेल्या रुग्णांची नोंद झालेली आहे.

दरम्यान, मुंबईतील वाढती कोरोना रुग्णसंख्या प्रशासनासाठी मोठं आव्हान बनली आहे. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी कोरोनाच्या नवीन लाटेचा सामना करण्यासाठी मुंबईकरांना काही सूचना केल्या आहेत.

BMC आयुक्तांच्या सूचना -

  • घरी क्वारंटाईन असलेल्या रुग्णांना मी आवाहन करतो की त्यांनी सर्व नियमांचं पालन करावं.
  • मुंबईकरांनी कोरोना प्रतिबंधसंबंधी लागू करण्यात आलेल्या प्रत्येक नियमाचं पालन करावं असंही आवाहन चहल यांनी केलं आहे.
  • याक्षणी घाबरण्याचं कारण नाही परंतु आपल्या सर्वांना अत्यंत खबरदारी बाळगावी लागणार आहे.
  • सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक आहे.
  • नागरिकांनी गर्दी जाऊ नये असंही आवाहन त्यांनी केलं.

मुंबईत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला ओमिक्रॉन कारणीभूत?

मुंबईत पसरलेल्या कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेला ओमिक्रॉन व्हेरियंट कारणीभूत आहे, असं आकडेवारीतून समोर येत आहे.

महापालिकेने जाहीर केलेल्या जिनोम सिक्वेंसिंग अहवालात 55 टक्के नमुन्यांमध्ये ओमिक्रॉन व्हेरियंट आढळून आलाय. 15 डिसेंबरला फक्त 2 टक्के रुग्ण ओमिक्रॉन व्हेरियंटने संक्रमित होते. तर गुरूवारी (30 डिसेंबर) राज्यातील 198 ओमिक्रॉन रुग्णांपैकी 190 मुंबईतील होते.

महाराष्ट्र टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले, "यात काहीच दुमत नाहीय की, मुंबईत ओमिक्रॉन व्हेरियंटने डेल्टा व्हेरियंटची जागा घेतली आहे."


Post a Comment

Previous Post Next Post