Ads By Google

बाजारपेठेत लवकरच दाखल होणार रॉयल इनफिल्डच्या प्रसिद्ध हिमालयनचे स्वस्त मॉडेल

 मुंबई – सध्या बाजारपेठेत रॉयल इनफिल्ड या जगप्रसिद्ध कंपनीचे बुलेट, हिमालयन, इंटरसेप्टर असे एक न अनेक धांसू मॉडेल उपलब्ध आहेत. आजच्या तारखेतही अगदी जुनी कंपनी असूनही तरुणांना खास भावनारी बाईक कंपनी रॉयल इनफिल्ड पूर्वी बुलेट या मॉडेलसाठी सर्वाधिक ओळखली जात होती. पण कंपनीचे अनेक मॉडेल आता बाजारात असून यामध्येच आता लवकरच एक नवे मॉडेलही दाखल होणार आहे. रॉयल इनफिल्ड फेब्रुवारी, 2022 मध्ये त्यांची नवी बाईक लॉंच करणार आहे.


सूत्रांच्या माहितीनुसार Scram 411 असे, या मॉडेलचे नाव असू शकते. विशेष म्हणजे ही बाईक प्रसिद्ध हिमालयन अँडव्हेंचर या मॉडेलचेच स्वस्त व्हर्जन असणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही बाईक भारतात फेब्रुवार, 2022 पासून विक्रीसाठी उपलब्ध असेल. या नव्या बाईकबद्दल कंपनीने अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य केले नसले, तरी रॉयल इनफिल्डचे चाहते या गाडीसाठी कमालीचे उत्सुक आहेत.

दुर्गम भागात चालवण्यासाठी कंपनीची प्रसिद्ध हिमालयन बाईक सर्वाधिक वापरली जाते. त्याप्रमाणेच Scram 411 ही बाईक देखील दुर्गम रस्त्यांसाठी सर्वाधिक वापरली जाऊ शकते. बाईकमध्ये उंच विंडस्क्रीन, स्प्लिट सीट, स्टँडर्ड लगेज रॅक, मोठे फ्रंट व्हील असे हिमालयनप्रमाणेचे फिचर्स असू शकतात. तसेच LS410, सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड, 4-स्ट्रोक, SOHC इंजिन मोटारसायकलच्या इंजिनमध्ये वापरले जाऊ शकते.


Post a Comment

Previous Post Next Post