Ads By Google

मराठवाडा लोकविकास मंच 2021 चा पुरस्कार अॅड. डॉ.अरुण जाधव यांना जाहीर

 मराठवाडा लोक विकास मंच च्या वतीने देण्यात येणारा कार्यकर्ता गौरव पुरस्कार  जामखेड तालुक्याचे  भूषण अॅड. डॉ.अरुण जाधव यांना जाहीर झाला आहे. अॅड डॉ.अरुण जाधव हे सामाजिक क्षेत्रामध्ये गेल्या 22 वर्षांपासून उल्लेखनीय काम करत आले  आहेत. यामध्ये कोरोना काळात उपासमारीची वेळ आलेल्या  कुटुंबाना केलेली भरीव मदत, गोरगरीब, कष्टकरी, वंचित समूहाच्या कायम बाजूने लढणाऱ्या ,त्यांच्या विकासासाठी व त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय- अत्याचाराच्या विरोधात कायमच आवाज उठवला आहे, शिक्षणापासून वंचित असलेल्या 71 मुलांचे संगोपन लोक मदतीतून निवारा बालगृह नावाच्या प्रकल्पामध्ये विना मूल्य केले जाते.


    आदिवासी व भटके विमुक्तांना न्याय मिळवून देण्याचे काम  अविरतपणे चालू आहे, एकल महिलांचे  प्रश्न ,पारधी समाजाचे प्रश्न   गायरान जमीन लढा, वस्त्यांवर होणारे गावगुंडा कडून हल्ले, नागरिकत्वाचे पुरावे मिळवून देण्यासाठी चालू असलेला लढा, कौंटूंबिक हिंसाचारामध्ये महिलांना समुपदेशन करण्याचे काम, समाजातील अडचणीत सापडलेल्या हजारो कुटुंबाना न्याय  मिळवून देण्यासाठी अहोरात्र झटणारे Adv. डॉ.अरुण जाधव यांना  त्यांच्या कामाची पावती म्हणून हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.मराठवाडा लोक विकास मंच च्या वतीने  विविध क्षेत्रातील मान्यवरांना सन्मानित करण्याचे हे  12 वे  वर्ष आहे.. या बारा वर्षांमध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांना सन्मानित केले गेले आहे. ही परंपरा कायम राखत लोक विकास मंच ने या वर्षी राज्यातून 12 पुरस्कार जाहीर केले आहेत.त्यापैकी adv.अरुण जाधवांना एक पुरस्कार जाहीर झाला आहे.सर्व सामाजिक क्षेत्रातून अरुण जाधव यांचे कौतुक होत आहे.



 हा कार्यक्रम 10 डिसेंबर मानवी हक्क दिनानिमित्ताने  ता.कळंब जिल्हा उस्मानाबाद या ठिकाणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती मा.विश्वनाथ (आणा) तोडकर अध्यक्ष मराठवाडा लोकविकास मंच,भूमिपुत्र वाघ उपाध्यक्ष मराठवाडा लोकविकास मंच यांनी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post